मी दुध व्यावसायीक 2020 चा

 नमस्कार शेतकरी मित्रांनो,



आतापर्यंत आपण पारंपारिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय केला. आपण कोणतेही प्रशिक्षण अथवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता केलेला व्यवसाय हा नेहमीच तोट्यात राहिला. आपल्याला आता दुग्धव्यवसायातील दररोज येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी नवीन विकसित तंत्रज्ञान माहिती असणे आवश्यक झाले आहे. दुग्धववसायात आवश्यक असणाऱ्या गाई  व  म्हशींच्या जातीविषयी माहिती घेणे , त्यांना योग्य चारा, त्यांचे आरोग्य व होणाऱ्या दूध उत्पादनावर योग्य प्रक्रिया व योग्य बाजारपेठ मिळविणे आवश्यक झाले आहे.

       आज एकविसाव्या शतकात सुद्धा शेतकऱ्यां पुढील अडचणी कमी होत नाहीत. दूध उत्पादकांना योग्य भाव ,योग्य बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे.

     स्वच्छ दूध उत्पादन व साठवणूक झाली पाहिजे. तसेच योग्य भाव मिळत नसेल किंवा योग्य प्रत तपासनी होत नसेल. अशा दूध खरेदीदारांना दूध विकुन दूध उत्पादकाला फायदा होणार नाही. म्हणून दूध उत्पादकाला दूध प्रत तपासणे तसेच दुधावर प्रक्रिया करून पदार्थ तयार करणे यात पारंगत असणे गरजेचे झाले आहे.

आज ग्राहकाकडे चांगल्या प्रतीचे दुग्धजन्य पदार्थ व दूध खरेदी करण्याची ऐपत आहे. ग्राहकांच्या सजगते मुळे दूध  व दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पनीर, खवा, चक्का, श्रीखंड, बासुंदी, आइस्क्रीम, रबडी, तूप व लोणी अशा विविध पदार्थांची मागणी बाजारात आहे.


हे विविध दुग्धजन्य पदार्थ दूध उत्पादक शेतकरी थोड्या प्रशिक्षणाने घरच्या घरी बनवू शकतो. त्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन असण्याची आवश्यकता आहे.



मी नामदेव सांडभोर आपणास वचन देतो की महाराष्ट्रातील 50000 खेड्यांमधील प्रत्येक शेतकऱ्याला याविषयीचे प्रशिक्षण देऊन सज्ञान बनविण्याचा माझा मानस आहे.

मला आशा आहे की माझ्या या चळवळीत तुम्ही सहभागी व्हाल आणि आपली मानसिक व आर्थिक फसवणूक टाळाल.

दोन गाई पाळा !! म्हातारपणाची चिंता टाळा !!

  मी फेसबुक वरील"दूध व आर्थिक नियोजन "या  फेसबुक पेजवर आपल्याला याविषयी माहिती देणार आहे. तरी सर्व दूध उत्पादक शेतकरी व छोटे दूध व्यवसायिक यांनी प्रशिक्षण घेऊन आपले उत्पन्न वाढवावे ही विनंती. आपल्या माहितीसाठी खाली फेसबुक पेज ची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून या चळवळीत सामील व्हा.

धन्यवाद!!


https://www.facebook.com/दुध-आणि-आर्थिक-नियोजन-104681594725354/


Comments

Post a Comment